गुजरातचे राजस्तानसमोर २१० धावांचे आव्हान   

जयपूर : आयपीएलच्या ४७व्या सामन्यात सोमवारी शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स आणि रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्तान रॉयल्स संघ आमने-सामने लढत आहे. या सामन्यात रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्तानच्या प्लेइंग ११ मध्ये २ आणि गुजरातच्या संघात १ बदल करण्यात आला आहे. गुजरातकडून करीम जनतने पदार्पण केले.

प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ४ गडी गमावून २०९ धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने ५० चेंडूत ८४ धावांची खेळी केली. तर जोस बटलरने २६ चेंडूत ५० धावा काढत नाबाद राहिला. साई सुदर्शनने ३९ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने १३ धावा आणि राहुल तेवतियाने ९ धावा केल्या. शाहरुख खान ५ धावा करून नाबाद राहिला.२०व्या षटकात राहुल तेवतिया एलबीडब्ल्यू झाला. त्याने ४ चेंडूत ९ धावांची छोटी खेळी खेळली. जोफ्रा आर्चरने राजस्तानला हे यश मिळवून दिले.संदीप शर्माने राजस्तान रॉयल्सला तिसरे यश मिळवून दिले. त्याने १९व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरची विकेट घेतली. सुंदरने ८ चेंडूत १३ धावांची खेळी केली.
 
या सामन्यात राजस्तानचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या हंगामात राजस्तानकडून सर्वाधिक धावा करणारा जैस्वाल आता इतिहासाच्या उंबरठ्यावर आहे. जैस्वाल आयपीएलमध्ये २००० धावांचा टप्पा गाठण्यापासून फक्त ३७ धावा दूर आहे. जयस्वाल गुजरातविरुद्ध ही कामगिरी करू शकतो. आतापर्यंत राजस्तानमधील फक्त ४ फलंदाजांना आयपीएलमध्ये २००० किंवा त्याहून अधिक धावा करण्यात यश आले. या खास यादीत समील होणारा जयस्वाल हा राजस्तानचा पाचवा फलंदाज असेल.
 

Related Articles